Maharashtra State Waqf Board
भारत सरकारने वक्फ अधिनियम, १९९५ हा कायदा पारीत करुन संपूर्ण देशात लागू केला. सदर कायदा महाराष्ट्र राज्यात दि.०१/०१/१९९६ पासून लागू करण्यात आलेला असून या कायद्यातील तरतुदींनुसार शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्र.वक्फ-१०/२००१/प्र.क्र.१५४/ल-३, दि.४ जानेवारी, २००२ अन्वये, औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील वक्फांची संख्या सुमारे २७,००० इतकी असून या सर्व वक्फांची मिळून एकूण सुमारे १,००,००० एकर इतकी जमीन आहे. यापैकी सुमारे ७० टक्के वक्फ जमिनी अतिक्रमणाखाली आहेत. सुमारे ११५ भूखंडावर शासकीय/निमशासकीय वा स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालय असल्याचा वक्फ मंडळाचा अहवाल आहे. स्थानिक वक्फ मालमत्तेचे संरक्षण करणे, विकास करणे तसेच हजारो वक्फ संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांचे तंटे सोडविणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, इ. कामे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या प्रशासकीय व्यवस्थापनेकडे सोपविण्यात आलेली आहेत.
Source
https://mdd.maharashtra.gov.in
Advertise