Kasturba Gandhi Girls Vidhyalay (Central)
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय.दुर्बल घटक व वंचित गटांतील शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या संधी प्राप्त व्हाव्यात, या दृष्टीकोनातून राज्यातील १० जिल्ह्यातील ४३ शैक्षणिकदृष्ट्या मागास गटांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये ही केंद्र पुरस्कृत निवासी योजना सुरु करण्यात आली आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील तरतूदींनुसार इयत्ता ६ वी ते ८ वी उच्च प्राथमिक या स्तरावरील विद्यार्थिनींकरिता सदर योजना लागू आहे. या विद्यालयांमध्ये दुर्बल व वंचित गटातील विशेष गरजाधिशिष्ट मुलींकरिता २५% जागा प्राधान्याने उपलब्ध करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांचे संकेतस्थळ
Source
https://mdd.maharashtra.gov.in/
Advertise